घरट़े
घराच्या टेरेस वर लावलेली दोन चिमणीची घरटी आणि तिथे रोज न चुकता दाणे टिपायला येणारया तीन चिमण्या मला कुठल्या तरी परत फेडिची जाणीव करून देतात. त्यांच्या चिवचिवाट़ाने कधी त्या काही बोलू पाहत असतीलही. पण तिथे संवादा पेक्षा कृती महत्वाची ठरते. विश्वासाने त्या रोज येतात. दाणे देणार हे घरट त्यानी आपलास करून टाकल आहे.
अशाच अजुन एका खरया घराट्याला भेट देण्याचा योग नुकताच आला.
हडपसर इथला घरटे प्रकल्पतला एक दिवस पुन्हा एकदा नव्या संवेदना देऊन गेला. आकुंचन पावलेल्या आयुष्याला पुन्हा एकदा आपले हात पसरून त्या चिमुकल्या जीवांनी आपलस केला. नक्की कुणी कुणाला काय दिल होत ? तिथे कुणाला मायबाप आहेत तर कुणाला कुणीच नाही पण सगळे त्या एका घरट्यात राहतात. आपल्या पेक्षा छोट्या मुलांची काळजी मोठी मुल घेतात. बाहेरून आलेल्या नव्या माणसांशीही नुसत्या तोंड ओळखीवरुन ती काही मिनिटात रूळतात. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदी होतात. हे सगळ पाहिल आणि पुन्हा एकदा खात्री पटली की अपोआप जुळणारे काही ऋणानूबंध कधीच ठरवून एकत्र येत नाहित , आयुष्यात स्वतः च घरट सोडून अनोळखी घरट्याचा शोध घेत राहिला पाहिजे. कुठे कोण तुमची वाट पाहत असेल आणि कुठे तुमचा शोध संपेल सांगता येत नाही...!
एक घरट़े अनोळखी,
हसरे आणि जिवंत..
मायबाप नसले तरी
मना नसे खंत....
एक घरट़े अनोळखी,
पोरक आणि एकट
स्वतः मधेच रमल तरी
आसू ना ते ढाळत...
एक घरट़े अनोळखी,
कधीतरी कोमेजत...
वाट पाहून कुणाची
स्वप्न पाहत निजत....
एक घरट़े अनोळखी,
उन वारा सोसणार
पावसाच्या एका सरीनेही
चिंब ओल भिजणार....!
एक घरट़े अनोळखी,
नितळ आणि कोवळ
इवल्याश्या मुठीत त्याच्या
आभाळ सार मावल....
एक घरट़े अनोळखी,
प्रेमाला आसुसलेल
मायेच्या एका हाकेतच
क्षितिज त्याच सामावलेल...
एक घरट़े अनोळखी,
विश्वासानी भरलेल
जगाच्या पाठीवर
आशेचा किरण उरलेल.....
आनंद
26 जुलै 2014