Powered By Blogger

Tuesday, August 14, 2012

स्वातंत्र्य


आता पुन्हा उडतील पताका, नवीन क्षितिजावरी,
पुन्हा कुठे झडतील बंदुका, नव्या जिवाच्या उरी.
शोकाच्या भरतील सभा, अन् रडतील पुन्हा प्रभा,
वर्षामागून वर्षे सरतील ,सुना मंदिराचा गाभा.

अघटीत सारे घडती भवती , तरीही सारे असे सोयरे,
स्वतःवरी न बेते काही ,म्हणून जीव सुखाने झुरे.
चुकचुक करुनी सोडून द्यावे हीच सवय या देहा,
दुर्घट ते कुणाला न दिसती, हवे तेच पहा.

वर्षामागुनी वर्षे सरती, गणती स्वातंत्र्याची,
घुसमट होऊन सारे जगती, भाषा मुक्तपणाची,
दुसरे कोणी करेल काही, हीच आशा उद्याची,
स्वतः उठाया धैर्य न जागे, भेकड नशा स्वतःची ,

उठा चला फिरवू दिशा, वाहु दे निश्चयाचे वारे,
नव्या क्षितिजावरती उडतील तेव्हा पुन्हा नवी पाखरे,
तोडूनी बंध उभे ठाकतील, हिमालयाचे कडे,
आपुल्या हाती भविष्य असता, कशाला देवाला साकडे....!
                                                                         
                                    ...आनंद

15 ऑगस्ट २०१२