मन अबोल अबोल,
कुण्या जन्माचे प्राक्तन.
मन चपळ चपळ,
कुण्या क्षणाचे जतन.
मन अधीर अधीर,
नसे काळाची फिकीर.
मन मधुर मधुर,
कधी सुखाची लकेर.
मन अथांग अथांग,
नसे कसले अंतर.
मन नितळ नितळ,
कधी दिसे आरपार.
मन गुपित गुपित,
असे अबोलीची कळी.
मन उधाण उधाण,
कधी आनंदाची टाळी.
मन आकाश आकाश,
दिसे इंद्रधनुची कमान.
मन कधी एक ध्यास,
तोडी सारे जुने लगाम.
मन सुगंध सुगंध,
देई श्वासाला जीवन.
मन बंधन बंधन,
उरे जन्माच्या
नंतर.........!
आनंद
२९ डिसेंबर २०१२