माणसं
बदलतात कि भोवतालची परिस्थिती ?
मला विचाराल तर मी म्हणेन दोन्ही नाही.
मुळात बदलत काहीच नाही. एकाच ग्रहावर राहून एकीकडे रात्र अन एकीकडे दिवस असतोच कि. बदलतो तो दृष्टिकोन. आरसा मागे बघणारा असला तरी पुढे ठाकणाऱ्या धोक्यापासून आपल्याला वाचवण्यासाठीच असतो. गोष्टी आहेत तिथेच असतात, तरीही इगो आड येतोच. समस्या मोठी नसतेच मोठा असतो तो अहंकार.

जगाने चांगलं म्हणावं म्हणून चाललेली धडपड खरतर माणूस म्हणून माणसालाच फार मागे नेते , तरीही चांगुलपणाची हाव काही जात नाही. आजूबाजूच्या कित्येक मनांमध्ये असूया नांदत असते हे डोळस माणसाला सुद्धा कळत नाही.
वाट फुटेल तिकडे धावणारं जग आजूबाजूला असताना खरंतर "साधं सरळ सोपं" हे शब्द जगण्याला लागू केले तर त्यातुन मिळणारा आनंद अनुभवणं एवढंच खरं आयुष्य असतं , बाकी सगळा इतरांसाठी मांडलेला देखावा असतो.
साधेपणा हा मुळात विकत घ्यायचा प्रकार नाहीच तो
उपजतच असावं लागतो.
आनंद
27 जुलै 2016
27 जुलै 2016