कधीतरी उगाच हिरमुसून बसावं , रुसावं या आयुष्यावर , हट्ट करावा उगाच
आणि दूर कुठे क्षितिजावर बुडून गेलेल्या सूर्याला म्हणावं नको येऊस
पुन्हा,
असं
म्हणताच वाऱ्याने येऊन कानाशी कुजबूज करावी,
त्या गार झुळुकेने
छेडले जावे जुने ठेवणीतले सूर आणि
अचानक डोळ्या समोर यावे धूसर पावसाळी दिवसाचे
क्षण ,
त्यात
दिसणाऱ्या समोर पडणाऱ्या थेंबानी हळूच कानोसा घेऊन
आपल्या कडे बघावं आणि जमिनीत
लुप्त होऊन जावं,
मग दिसावी उबदार चूल आणि बाडगणाऱ्या ज्वाळा
मग दिसावी उबदार चूल आणि बाडगणाऱ्या ज्वाळा
त्या मैफिलीत फडफडणाऱ्या पिवळ्या दिव्याने
आपला जीव मुक्त करावा आणि
पसरावा काळामिट्ट अंधार आणि मग पुन्हां हिरमुसून बसावं,
हट्ट
करावा ,रुसावं
आणि कोसावं त्या दिव्याला परत उजळण्यासाठी, क्षणात
डोळे उघडावे आणि
बघावं समोर तांबड्या रंगाच्या क्षितिजावरून वर येणारं लाल सूर्य
बिंब.....!
आनंद
12 ऑक्टोबर 2016
12 ऑक्टोबर 2016