Powered By Blogger

Monday, May 29, 2017

उगाचंच सहजच 4 : धुकं

आयुष्यातले कुठल्या क्षणांसाठी माणसाने स्वतः ला विसरून जावं ? आणि मुळात हि सुखाची हि धडपड कशासाठी ? असे प्रश्न खरतर खूप साधे आणि अनेकांना पडणारे.
अशा वेळी मला आठवतं ते धुकं.

समोरचं किंवा आजूबाजूचं दिसत नसूनही मनाला त्या अनिश्चिततेमध्ये आनंद वाटत असतो. पायाखालची वाट सोडून आजूबाजूला काहीही दिसलं नाही तरी सगळ्या गोष्टी आहेत तिथेच असतात. फक्त आपल्याला त्या दिसेनाशा होतात.

कुणाच्या इच्छेने धुकं कधी दाटत नाही. अनुरूप परिस्थिती निर्माण झाली कि ते आपसूक येतं.
आयुष्यातल्या अशा धुक्याना सुद्धा सामोरं जाता येणं म्हणजे खरतर मजा आहे. त्याच्याशी दोन हात केले आणि आपल्यातला प्रकाशाची जाणीव समोरच्याला झाली कि ते आपोआप विरळ होतं आणि अचानक गायब सुद्धा होतं.

आपल्या आतला प्रकाशाची ज्योत महत्वाची, ती जपत रहायचं मग अंधार असो  वा धुके असो वाट नेहमी उजळत राहते.
आणि याच उजळलेल्या वाटांवर आपल्याला स्वतः ला विसरायला लावणारे क्षण  आणि त्या सोबत येणारं सुख दोन्हीही गवासतात.
                                                                                                                          आनंद
                                                                                                                          29 मे 2017