Powered By Blogger

Monday, October 23, 2017

उगाचंच सहजंच - जुनं नवं



जुन्या नव्याचं नातं खरंच गमतीशीर, एकमेकांना न सोडता दूर जाणं आणि कधी कधी सोडूनही जवळ असणं.
कदाचित आपलाच अट्टाहास असतो सुखाची भोळी स्वप्न रंगावायचा , स्वप्नातले रंग भावले कि वर्तमानातली काळी पांढरी सोबत दिसेनाशी होते ती याच मुळे.


जे हातात आहे तेवढं सांभाळता यायला हवं बाकी सगळं खूप साधं सरळ होतं मग.
इतरांना समजेल किंवा उमजेल हा नंतर चा भाग झाला, पण अर्ध आयुष्य आपले विचार इतरांना पटवण्यात घालवण्यापेक्षा निश्चल पाण्याच्या डोहासारखं राहणं जास्त अर्थपूर्ण आणि तितकाच अवघड असतं. तरंग खुशाल उठू द्यावे पण नंतर पुन्हा शांत होता यायला पाहिजे.


गळून पडलेल्या पानाला जर हिरवळ भावली आणि त्याने तिथेच राहायचा अट्टाहास धरला तर ऋतूचक्र चालेल कसं, तिथे पानाने समर्पण करून मातीत मिळून जाणं जास्त महत्वाचं आहे म्हणजे झाडाला नवा हुरूप येईल आणि हिरवळीला पुढच्या पानगळीची ओढ लागेल .....!


आनंद
26 Oct 2017