जगणे म्हणजे,
शिंपल्यातले मोती शोधत वाहणे,
कधी हर्ष तर कधी निराशा, हाती झेलत जाणे..!
जगणे म्हणजे,
शंखातुनी जन्म घेऊनि मुक्त आकाश पहावे,
तिमिर दूर कराया अपुलाच प्रकाश व्हावे..!
जगणे म्हणजे,
रेती वरती पाऊल रेखत जाणे,
पुसले जरी जुने ठसे तरी, लाटेला खुणवत हसणे...!
जगणे म्हणजे,
नव्या दिशेला प्रकाश शोधत जाणे,
कड्याकपारी ओलांडुनी पल्याड पाहत जावे...!
आनंद
17 dec 2017