धुंद पावसाळी हवा
रंग सृष्टीचा हा नवा..
नवा साज तो लेवूनि
येई वेडी सर ही माहेरा....
चिंब ओली होते माती
नवे कोंब ते रुजती...
सावळ्या ढगांच्या साथीने
मन हिरव्या रंगात भिजती...
आळसावुनिया सृष्टी,
कूस ही बदले...
पुन्हा नांदायला येति ,
वर्षा ऋतूंची पाखरे...
निळा लुप्त झाला तरी,
सावळ्याची लागे ओढ..
पहिल्या प्रेमाची अशी ही,
भेट अधुरी क्षणभर..
इंद्रधनू कधी सोबती,
कधी गडद अंधार..
आठवांच्या या मौसमी,
कुणी छेडे तो गांधार..
आनंद
17 जून 2018