वाट पाहतोय पहिल्या
पावसाची...! वाट पाहतोय पहिल्या सरीची..! वर्षभर वाट पाहून आसुसलेल्या शरीराला आता
ओढ आहे ती फक्त टपोऱ्या थेंबांची.
कोसळणाऱ्या धारांबरोबर एकदा
वाहून जाईन म्हणतो, कोसळणाऱ्या पावसाच्या धारांचा आवेग उरात भरून स्वच्छंद पणे बागडून
घेईन म्हणतो. अधीर झालेल्या मनाला हवा आहे, ढगांनी गच्च भरलेल्या
क्षितीजाचा आणि विजेच्या लखलखाटात स्वतःला समर्पित करणारया धरणीच्या मिलनाचा , आनंदाचा ऋतू..........!
पावसाळा....!
खरतरं काय असतं पावसाळ्यात जागोजागी
साचलेला पाणी, चिखल, काळ्या ढगांनी व्यापलेलं आकाश, दिवस दिवस दडून बसलेला सूर्य.,
असं खूप लोकांना वाटू शकते, पण मला मात्र पाऊस हा नितळ आनंद देणारा एखाद्या निरागस
मुला सारखा किंवा आयुष्याच्या संध्याकाळी दोन्ही हातांनी आनंद लुटणाऱ्या एखाद्या
वृद्ध आजी आजोबां सारखा भासतो. पाण्याचे थेंब जमिनीवर पडताच मातीतून अत्तराचा
सुगंध बाहेर येतो आणि उन्हात करपलेल्या प्रत्येक जीवाला नवचैतन्य देऊन जातो.
मनावरची जळमटं धुवून
टाकणारा आणि निसर्गाला हिरवी शाल पांघरणारा ऋतू पावसाळा.....!
आनंद
३१ मे २०१३
refreshing....
ReplyDelete