झाड वाढतं तसं खरंतर ते एकटं होऊ लागतं फांद्या वर जातात जमीन दूर होऊ लागते.
फांद्यांना आकाश हवं असतं अन खोडाला जमीन.
अशा वेळी एखादी वेल कुठूनशी येते आणि दोघांची गाठ बांधून ठेवते.
सगळ्याच झाडांना अशा वेली मिळत नाहीत. त्याला नशीब लागतं.
जग मात्र त्या वेलीला परावलंबी म्हणून हिणवत राहतं.
ज्याला जे हवं ते मिळवून देऊन वेल मात्र झुरत राहते. धागा जोडणाऱ्या या वेली मला जास्त भावतात ते त्याच मुळे.
माणसांना जोडायला अशाच वेलींची गरज असते अवती भवतीच्याच जगात त्या असतातही फक्त त्या साठी झाडाच्या फांदी सारखं थोडं झुकावं लागतं
आणि खोडा सारखं आधारवड व्हावं लागतं वेल आपोआप तुम्हाला बिलगते.
आनंद
No comments:
Post a Comment