क्षितिजावर हलके हलके तरंगणारे रंग आणि त्यांच्या कडे बघून झुलणारं निळंशार पाणी जसा वेळ जाईल तसं ते नकळत त्याच्या रंगात मिसळून गेलं. जसा अंधार दाटू लागला तसा रेतीवर उमटलेल्या पावलांनी निरोप घेतला. फुटपाथ वरचे दिवे लागले आणि वाटा उजळून निघाल्या. आणि त्या पिवळ्या लालसर रंगात मागे असलेल्या हिरव्या झाडाची वाळलेली पाने दिसली.
आयुष्याच्या संध्याकाळी विसावलेली जगाला फारसा उपयोग नसलेली त्यांचा फोटो काढतानाच एका वयस्कर आज्जीने आपुलकीने चौकशी केली आणि ते फोटोतले रंग बघून आश्चर्य व्यक्त केलं.
तिच्या आयुष्यातले रंगही असेच सुंदर असावेत असं उगाच वाटून गेलं....!
अंधारात नाहीशा होणाऱ्या वाटेवर ती निघूनही गेली...!
No comments:
Post a Comment