Powered By Blogger

Saturday, December 18, 2010

अतृप्त गाणं.....!


अतृप्त गाणं.....!

आत डोकवताना वाटल
काय असेल आत
बाहेर् तेच आत असेल
कि मन करेल् घात?

 वाटलं.....
 दुःख असेल
 इछ असतिल
 पुर्ण...
 अपुर्ण............

 लोभ असेल
 माया असेल
 जगणं असेल........
 जीर्ण...............

 स्वार्थ  असेल
 अर्थ असेल
 एक किवा........
 भिन्न...............

 श्रद्धा  असेल
 आस्था असेल
 बोलकी......
 मुकी....................

 भान  असेल
 तोल असेल
 गती. असेल.....
 हलकी.........

  आशा  असेल
 विश्वास असेल
  सुप्त.....
  अलिप्त.........


  सुर  असेल
  ताल असेल
  गाणं असेल.....
  अतृप्त ................

                                                            आनंद

Saturday, December 4, 2010

Butterflies - Clicked by me







एक संवाद


तो : तो सूर्य पाहिलास ?

मी : मगापासून तोच पाहतोय.

तो : काय दिसतय?

मी: एक वलय अस्ताला जाताना दिसतंय. बुडणाऱ्या सूर्याकडे पाहायला मला कधीच आवडत नाही. पण नाईलाजानं पाहावा लागतं.

तो : त्या सूर्याकडून कितीतरी गोष्टी शिकण्या सारखं आहेत नाही ?
जणू आपल्याला नवीन संदेश देऊन जातोय.

मी: मुळीच नाही. तो तर आपल्याला उद्याची आशा लावून पळतोय.

तो : हा झाला दृष्टीकोनातला फरक.

मी : नाही हि सत्यता आहे.

तो : पण माणूस तर आशेवरच जगतो न ? आशा हि प्रत्येकाला असते, पण म्हणून काही आशा लावून जाणारा पळपुटा झाला नाही.

मी: मी तसा कुठे म्हटलं. पण सत्य न स्विकारणा हा देखील गुन्हाच ! माणूस जरी असत्य बोलत वागत नसला तरी तो जर सत्याची धरपकड करत असेल तर काय करायचं ?

तो : हे जितका म्हणणं सोपं आहे तितकंच निभावणं सोपं नाहीये.

मी : माहितीय मला ! बिनबुडाची भांडी कधीच उभी राहत नाहीत. पण आजूबाजूला पाहिल्यावर काय दिसतयं ? प्रत्येक जण त्या सुर्याचाच अनुकरण करताना दिसतोय. स्वतःच्या इगो साठी नाती तुटत आहेत, पैशासाठी माणूस आपल्या माणसाना दूर करत आहे, न संपणाऱ्या या स्पर्धे मध्ये धावत सुटला आहे. स्वतः साठी जगणं विसरून गेला आहे, आणि इतरांसाठी जगणं तर त्याच्या खिजगणतीतही नाही.

तो : पण म्हणून काय सुर्यना अस्ताला जाणं सोडवा ?

मी : मी तशी अपेक्षाच करत नाही आणि ती केली तरी ते प्रत्यक्षात शक्य नाही हे मला माहितीय.
आयुष्यातल्या काही क्षण जर आजूबाजूचे आवाज ऐकना बंद केला,  तर दिसेल कि पाखरा किती छान गातात, फफुलपाखरे आपल्याच धुंदीत उडत असतात, झाडा आपल्या मनात येईल तेव्हा डुलतात, झऱ्याचा पाणी निर्व्याज वाहतच राहता काहीही अपेक्षा न करता, या साऱ्या गोष्टी आपसूक पणे चालूच आहेत, मग माणसाना का बदलाव ?
साधा आयुष्य जगायला इतके कष्ट का पडावेत ? इतका का ते अवघड आहे ? नाही नक्कीच नाही , आयुष्याला सामोरे जाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. हो पण ते सामोरं जाताना मात्र स्वतःशी संवाद साधना गरजेचा आहे, नाहीतर माणसाचा माणूस पण टिकण अवघड होऊन बसेल .
 
                                                                  आनंद

Tuesday, November 30, 2010

पाडगांवकरांची मला आवडलेली एक कविता.


"
व्यथा"

तुज कधीच नाही कळले, नाही कळले
मी तुझ्याचसाठी किती किती तळमळले!

पण कसे कळावे? तेव्हा अभिमानाने
भांडले,तंडले,फणफणलें क्रोधानें
काटेरी उधळुनी शब्द परतलें मागें
ते घडलें सारे..... सारे अंधपणानें!

पण खरेच नव्हते तसले काहि मनांत
जे होऊनी अग्नी धगधगलें शब्दांत
जातांना भिडली नजर तुझ्या नजरेला
मी व्यथा पाहिली भिजलेली तेजांत!

का खरीच होती माझी तुजवर प्रीत?
कां अशी वागले? कुठली असली रीत?
अपुल्य़ाशी केले मीच समर्थन माझे
अन म्हटले जुळवीन पुन्हा नवीनच गीत

त्या गीताचे पण सूर कधीच न जुळले
मी ज्योत व्यथेची होऊनी जळले, जळले
मी म्हटले विसरुनी जाईन सारे सारे
तुज सांगु कसे रे मलाच मी किती छळले!

वाटले कितीकदा पुन्हा तुजकडे यावे
अन मिठीत तुझिया माझेपण विसरावें
वाटले कितीकदा मिटून अलगद डोळे
रे तुझ्या प्रीतिच्या आवेगांत बुडावे !

ओसरला अवचित कलह मनांतील सारा
अन विरला क्षणी त्या अभिमानाचा पारा
उगवला मनाच्या निर्मळ क्षितिजावरती
कोवळी शुभ्रता शिंपित हसरा तारा !

मी तशीच उठले... होता जरि अंधार...
काढियला अडसर आणि उघडिले दार
का फसविती डोळें? तूच उभा दाराशी...
मी कोसळलें... घेऊन तुझा आधार !

शिर खुपसुनि वक्षीं स्फुंदुनी स्फुंदुनी रडलें,
मी वादळातल्या फुलापरी थरथरलें
"
या चरणांपाशी मीच निघालें होतें-"
वाटलें म्हणावें- परंतु शब्द न फुटलें !