तो : तो सूर्य पाहिलास ?
मी : मगापासून तोच पाहतोय.
तो : काय दिसतय?
मी: एक वलय अस्ताला जाताना दिसतंय. बुडणाऱ्या सूर्याकडे पाहायला मला कधीच आवडत नाही. पण नाईलाजानं पाहावा लागतं.
तो : त्या सूर्याकडून कितीतरी गोष्टी शिकण्या सारखं आहेत नाही ?
जणू आपल्याला नवीन संदेश देऊन जातोय.
मी: मुळीच नाही. तो तर आपल्याला उद्याची आशा लावून पळतोय.
तो : हा झाला दृष्टीकोनातला फरक.
मी : नाही हि सत्यता आहे.
तो : पण माणूस तर आशेवरच जगतो न ? आशा हि प्रत्येकाला असते, पण म्हणून काही आशा लावून जाणारा पळपुटा झाला नाही.
मी: मी तसा कुठे म्हटलं. पण सत्य न स्विकारणा हा देखील गुन्हाच ! माणूस जरी असत्य बोलत वागत नसला तरी तो जर सत्याची धरपकड करत असेल तर काय करायचं ?
तो : हे जितका म्हणणं सोपं आहे तितकंच निभावणं सोपं नाहीये.
मी : माहितीय मला ! बिनबुडाची भांडी कधीच उभी राहत नाहीत. पण आजूबाजूला पाहिल्यावर काय दिसतयं ? प्रत्येक जण त्या सुर्याचाच अनुकरण करताना दिसतोय. स्वतःच्या इगो साठी नाती तुटत आहेत, पैशासाठी माणूस आपल्या माणसाना दूर करत आहे, न संपणाऱ्या या स्पर्धे मध्ये धावत सुटला आहे. स्वतः साठी जगणं विसरून गेला आहे, आणि इतरांसाठी जगणं तर त्याच्या खिजगणतीतही नाही.
तो : पण म्हणून काय सुर्यना अस्ताला जाणं सोडवा ?
मी : मी तशी अपेक्षाच करत नाही आणि ती केली तरी ते प्रत्यक्षात शक्य नाही हे मला माहितीय.
आयुष्यातल्या काही क्षण जर आजूबाजूचे आवाज ऐकना बंद केला, तर दिसेल कि पाखरा किती छान गातात, फफुलपाखरे आपल्याच धुंदीत उडत असतात, झाडा आपल्या मनात येईल तेव्हा डुलतात, झऱ्याचा पाणी निर्व्याज वाहतच राहता काहीही अपेक्षा न करता, या साऱ्या गोष्टी आपसूक पणे चालूच आहेत, मग माणसाना का बदलाव ?
साधा आयुष्य जगायला इतके कष्ट का पडावेत ? इतका का ते अवघड आहे ? नाही नक्कीच नाही , आयुष्याला सामोरे जाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. हो पण ते सामोरं जाताना मात्र स्वतःशी संवाद साधना गरजेचा आहे, नाहीतर माणसाचा माणूस पण टिकण अवघड होऊन बसेल .
आनंद
No comments:
Post a Comment