Powered By Blogger

Saturday, October 6, 2012

विरह



कधी कधी दूर राहून नाती अजून जवळ येतात. आपलं माणूस दूर झालं कि मनाची होणार तगमग आपल्याला विरहाची जाणीव अजून तीव्र करते. नक्की काय असतं विरहामधे ? माणूस जवळ असलं कि आपण त्याला गृहीत धरत असतो का? तेवढंच प्रेम आपण करत असलो तरीही विरहात माणूस हळवा का होतो ?   
तहानलेली  धरणी विरहाने अतृप्त असताना एखादी सर येऊन तिला जेव्हा तृप्त करते तेव्हा तिला होणारा आनंद हा विरहाच्या साऱ्या दु:खासमोर खूप छोटा वाटू लागतो.
माणसाचाही असंच असतं, दूर होऊन त्रयस्थपणे आपल्या नात्याकडे पाहण्याची एक दृष्टी विरह देत असतो. एरवी त्याच नात्याकडे हक्काने पाहताना कळत नाहीत अशा अनेक गोष्टी फक्त दूर झाल्यावर कळू लागतात.  प्रेम करणाऱ्या दोन जीवांचा विरह त्यांच्या डोळ्यात कधी कधी अश्रू आणत असेल पण नंतर येणाऱ्या सुखाची जाणीव सुद्धा करून देत असतो.  भविष्यातले आनंदाचे क्षण एरवी आपल्याला दिसत नसतील पण विरहात मात्र ते सदासर्व काळ आपल्याला खुणावत असतात. आनंदाची सुखाची स्वप्ने दाखवणारा विरह खरतर प्रत्येकाच्या आयुष्याला अर्थ जोडत असतो. म्हणूनच  थोड्याफार काळाने यायलाच हवा असं विरह सुद्धा कधी कधी आपला वाटू लागतो......!


अशाच विरहात उमटलेली ही पावले...... आणि मनात स्मरलेल्या ओळी.....!
  



भाषेला दूर सारून व्यक्त झालेली भावना.... शेवटी उरते ती फक्त हुरहूर शब्द जणू नाहीतच कुठे......!





I Will love you all the time,  it does not  matter now, ….!
All I know is you are mine,  else I go down..!
Day passes and nights remains,
Sun goes down and then it rains..!
But I feel happy when you care,
My heart beats, but it’s not there..!

Close your eyes and dream about tomorrow,
 Leave behind past and forgot all sorrow..!
Come down here and let me kiss you,
I can’t smile because I miss you,
I Will love you all the time, , it does not matter now, ….!
                                                      

                                                             आनंद ६ ऑक्टोबर २०१२



2 comments: