Powered By Blogger

Thursday, April 30, 2015

लग जा गले

लग जा गले  हे मदन मोहन आणि लताचं गाणं माझं सगळ्यात आवडतं गाणं. अगदी हजारो वेळा ऐकून सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावं वाटणारं असं हे गाणं. फावल्या वेळात ते आपल्या आवाजात रेकॉर्ड करायचा मोह मला आवरला नाही आणि त्यातून घडला विडीओ. खूप दिग्गज लोकांची हि कलाकृती गाणं हि खूप मोठी गोष्ट आहे, मला ते फारसं जमलंय असं अजिबात नाहीये पण तरीही एक चाहता म्हणून माझ्याकडून हा प्रयत्न.

समुद्राच्या लाटांचा आवाज यावा आणि रात्रीच्या चांदण पसरलेलं असावं आणि त्याच समुद्राने आर्त हाक मारून लाजऱ्या रात्रीला बोलवाव आणि म्हणावं “लग जा गले” . कारण दुसऱ्या दिवशी दिवस होताच तीच अस्तित्व नाहीसं होणार आहे . असं काहीसं चित्र हे गाणं ऐकलं कि माझ्या नजरे समोर उभं राहत. आर्त हाकेचा जणूकाही परिपाठ असल्या सारखे ,असे एक एक शब्द या गाण्यात लिहिले आहेत. 

                                                               
                                                               आनंद
                                                               ३० एप्रिल २०१५ 

1 comment: