Powered By Blogger

Monday, August 31, 2015

एकांत

एकांत

दाटलेल्या ढगांना
आतुर अशी किनार
आठवांच्या थेंबांना
मातीचा हुंकार

मनातून उमटलेला
कोवळा स्वर
निळ्या पाण्याचा
गहिरा तळ

धूसर पहाटेला
फांदीवर चा पक्षी
अदृश्य आकाशाला
सोनेरी नक्षी

केसरी कातरवेळेला
दिव्यांची आरास
अंधाराच्या साथीला
स्वप्नांचा प्रकाश

स्वप्न की सत्य
याचीच भ्रांत
अनमोल क्षणांचा
दुर्मिळ एकांत
 
                             आनंद

1 comment: