Powered By Blogger

Sunday, September 20, 2015

तोच पाउस..

पाउस नेहमी वेगळा असतो. पावसाळा सुरु झाला तेव्हा त्याच रूपड़ खुप हवाहवास आणि एखाद्या खेळकर मुलासारख होत. या वेळेस जसजसा पावसाळा पुढे सरकत होता तसतसा तो मनाची धास्ती वाढवत होता. दुष्काळ समोर फेर धरून नाचू लागला आणि तोच पाउस दुष्ट वाटू लागला. त्याने दिलेली हुलकावणि ही एक अतिशय क्रूर चेष्टा झाली. शेतकरी हवालदिल झाला. झाडाला नव्या पालवी च्या ठिकाणी प्रेत दिसू लागली. शहरे एकीकडे सण साजरे करत  असताना दूसरीकडे मात्र माणस जीव गमावू लागली. यातच तो पुन्हा बरसला तोच पाउस...
नदयाना पुर आले, डोंगर हिरवे झाले आणि शेत डोलू लागली पण त्याच्या त्या शिडकाव्याने गेलेली माणस परत आली नाहीत आणि येणार ही नाहीत. पण तरीही पाउस अजुनही तोच आहे आणि तोच राहिल..


No comments:

Post a Comment