Powered By Blogger

Saturday, July 30, 2011

नवा साज


 
निळे कोवळे तेच चांदणे 
अबोल वारा वाही 
शब्द सावळे आठवणींचे 
अधीर सारे काही

बावरी होऊन धावत सुटे 
अवखळ नदी निळी 
फूल होण्या आधीच लाजे 
जाईजुईची कळी

नभी दाटती सप्तरंग ते 
सुखाची असे नांदी 
चिंब सरीने न्हाऊन डोले
चाफ्याची हिरवी फांदी

श्वासास बिलगुनी लपुनी बसे 
निशिगंध सुगंधी 
स्वप्नांच्या राज्यात वसे 
लावण्याचे मोती

ऋतूचक्र असे हे फिरता 
कोणी कसे जगावे 
परवा नसावी आता कुणाची 
लेवुनी साज सजावे
             .....आनंद 


No comments:

Post a Comment