अलगद पाण्यावरी
सरसरे शहरुनी काटा
श्रावणसरी शोधत येती
उन्हातूनी वाटा.. १
पानांवरती थेंबांच्या अन्
भरती मग शाळा
श्रावण सरी गुंफुनी घेती
मोत्यांच्या माळा.. २
डोंगरातुनी कोसळती जणू
अमृत जलधारा
अवखळ गंधित चोहीकडे अन्
वाहे श्रावण वारा. ३
कळीस पडते खळी
हसते अशी ती गालात
फुलण्याचाही विसर पडे मग
श्रावण प्रेमात... ४
उन सरीचा लपंडाव हा
धुंदल्या क्षणात
इंद्रधनुही कधी जन्मती
श्रावण रंगात... ५
चिंता दुखे दूर हरवती
ऋतू हा आनंदाचा
नवीन उर्मी देऊन जातो
श्रावण चैतन्याचा...६
आनंद
No comments:
Post a Comment