Powered By Blogger

Friday, August 26, 2011

धुक्याच्या पल्याड


धुक्याच्या पल्याड वसे गाव कुठले ?
न उमजे तरीही कसे नाव सुचले ?

धुक्याच्या पल्याड असे गुढ काही
न सरते तरीही कशी रात जाई

धुक्याच्या पल्याड असे पायवाट
ना चाले कधीही तरी देई साथ

धुक्याच्या पल्याड असे गीत कुठले?
ना गाई कुणीही तरी शब्द दिसले

धुक्याच्या पल्याड असे स्वप्न अर्धे
अर्थ जगण्यास येता कसे सत्य सरते ?

धुक्याच्या पल्याड श्वास तेच ओळखीचे
हात हातात घेता भास तेच नेहमीचे 

धुक्याच्या पल्याड आठवांचे किनारे
सुखाच्या सरीने विझती निखारे..!
                                             .......आनंद


2 comments:

  1. फोटोंमुळे विशेष मज्जा आली वाचताना !

    ReplyDelete
  2. धुक्याच्या पल्याड श्वास तेच ओळखीचे
    हात हातात घेता भास तेच नेहमीचे.

    hmmmmm

    काय आहे आनंद साहेब तुमच्या धुक्याच्या पलाड ?????

    ReplyDelete