Powered By Blogger

Monday, September 7, 2020

उगाचंच सहजंच :- संवेदना 1 - वाढदिवस




Weekend ची सायकल ride करताना नेमके माझ्या सायकल चे नव्याने बसवलेले स्टँड पुन्हा तुटले. Ride तशीच पूर्ण करून मी लगोलग दुकान गाढले.  सकाळची वेळ असल्याने नुकतेच दुकान उघडून झाडलोट सुरू होती. तिथे माझ्या आधी अजून एक तरुण उभा होता.

मी आधी दुकानदाराला सायकल चा प्रॉब्लेम दाखवला आणि त्याच्याशी हुज्जत घातली की आठवड्यापूर्वी बसवलेल्या स्टँड ला असा issue का आला वगैरे आणि दुरुस्त करण्यास सांगितले, पाहतो म्हणून तो पुन्हा दुकानाची मांडामांड करायला लागला.

मी पायरीवर बसकण मारली. तोच इतकावेळ माझ्या सायकलचे कुतूहल मिश्रित निरीक्षण करणाऱ्या तरुणाने मला विचारले किती चालवता सायकल तुम्ही ? मी जुजबी उत्तर दिले ,"असे काही ठरलेलं नसते वगैरे".

त्याच्या कडे पाहिले तर पायात साधी झिजलेली चप्पल, अंगात सदरा आणि मळलेली पॅन्ट पाहून तो कोणी कारागीर असावा असे मला वाटून गेले.

त्याने पुन्हा प्रश्न केला "स्पीड मिळत असेल नाही ?", मी 'हो' म्हणालो.

त्याचे निरीक्षण चालूच होते, तोच मी मध्ये पुन्हा दुकानदाराला दुरुस्त लवकर करा सांगितले.

पुन्हा त्या तरुणाने मला सायकल च्या किमतीबद्दल विचारले मी पुन्हा जुजबी उत्तर दिले, पण माझ्या उत्तराने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते, 

हे असे अनुभव मला काही नवे नसल्याने मला त्यात काही विशेष वाटत नव्हते. 

थोड्या वेळाने तोच पुन्हा स्वतः बोलू लागला, मला माझ्या मुलाला सायकल घायची आहे,त्याचा परवा वाढदिवस आहे.  

मी त्याचे कौतुक करून सायकल चालवण्याचा छंद कसा चांगला यावर प्रतिक्रिया दिली. 

त्या तरुणाने पुढे बोलणं चालू ठेवले, 

तो इतर मुलांची सायकल पाहून मला सारखा विचारतो मला सायकल हवी म्हणून.

आधी एक छोटी सायकल होती पण दोन मुलात भांडणं झालं आणि मी जोरात फेकली त्यात ती तुटली, तेव्हा पासून त्याची सायकल सुटली. आता मुलगा दुसऱ्याची सायकल घेऊन खेळतो.

तेव्हा या वेळी मी त्याला विचारलं या वेळेस वाढदिवसाला तुला 500-1000 rs चा ड्रेस आणू का तर तो म्हणे नको सायकल आणा.

आता माझेच पहा लग्नाआधी असे कपडे किंवा चप्पल  कधी घातली नाही, पण माणसाला बदलावे लागते आता मुलांना काय हवे ते द्यावे लागते, "दिस लय चेंज झ्याहलेत बघा".

त्याच्या शेवटच्या वाक्यावर मी हसलो आणि मान डोलवली.

तोच दुकानदार येऊन त्या तरुणाला सायकल दाखवायला घेऊन गेला, जेमतेम 10 मिनिटात ते दोघे बाहेर आले आणि तरुण चालत निघून गेला.

विचारल्यावर कळले की त्याला 1000 रुपयात सायकल हवी होती कारण त्याने तेवढेच पैसे मुलाच्या वाढदिवसासाठी जमवले होते. एवढ्या मोठ्या दुकानात अशा किमतीत सायकल मिळणे अशक्यच.

आनंदाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी, मी निव्वळ सायकल चे 650 चे स्टँड लावत होतो आणि कुणी तेवढयाच किमतीला मुलाचा सायकल चा हट्ट पुरवू पाहत होता.

अचानक सुई टोचवी असं काही झालं आणि अशा वेळी खूप काही करावं वाटत असतानाही आपण तसेच बसून राहतो असं काहीसं झालं, पुढे सरसावून मी तो तरुण कुठे चालत गेला पाहिलं पण गर्दी त्या बाबतीत दुजभाव करत नाही ती कुणालाही कुठल्याही भेदभावाशिवाय आपल्यात सामावून घेते, त्यामुळे तो लगेच दिसेनासा झाला होता. 

आपण माणसांनी सामाजिक भिंती उभ्या करून सुखाला पैशात तोलून धरलं आहे असं उगाच वाटून गेलं. कळीचं फुल होईलही पण त्याला होण्याला लागणारा वेळ इतकाही नको की झाड स्वतःहून तिला कोमेजून टाकेल. 

माझ्या सायकल चे स्टँड तुटले होते पण आता तोल मात्र माझा ढळला होता.

आनंद

6 Sept 2020

Thursday, July 9, 2020

उगाचंच सहजंच :- "ख्वाहिशें"

उगाचंच सहजंच :- "ख्वाहिशें"


कही दूर एक पहाड़ पर, एक सुबह एक सफेदसी कली शरमाती हुई ,थोड़ीसी घबराई हुई सोच रही थी कि मैं फूल बन पाउंगी या नही...!
क्या ये जगह मेरा घर है ,या मैं कही फेके हुए पौधे का कोई हिस्सा थी और आज अचानक बहार बन गई ?
क्या है मेरा रिश्ता इस पहाड़ से , जमीन से ?
मैं बोझ हूँ या फिर बिना किसी मक़सद से मिली है मुझे जिंदगी ?
क्यो आणि किसको दिखाऊ मैं अपने रंग रूप को , अगर कोई बरसो गुजरा नही इन रास्तों पर ?
ऐसे अनगिनत सवाल जब उसके मन मे चल रहे थे,बड़ी मायूस दिख रही थी,
 तभी एक उड़ता हुआ, या फिर बहता हुआ कहिये, 'पंख का फूल' उसे देख बोला, किसका इंतेजार कर रही हो ऐ खूबसूरत कली बन जाओ अब फूल और पूरी करले अपनी ख्वाहिश...!
कली जग गई, समझ गई और खुल गई उसकी आंखें, जिंदगी सिर्फ किसी दूसरे के लिए नही होती , खुदकी ख्वाहिशों को पूरी करने के लिए भी होती है....
खिलना मेरी ख्वाहिश हो तो मुझे किसीका इंतेजार करने की क्या जरूरत,
इतना सोचते ही, अचानक खुल गई उसकी हलकी पत्तों की पंखुड़िया और खिल गई उसकी दुनिया....!
किसीने सच कहा है, ख्वाहिशों का होना जरूरी है वरना जिंदगी गुलजार कैसे बनेगी.....!



आनंद
10 July 2020

Wednesday, January 22, 2020

उगाचंच सहजंच - कृष्ण आहे पाठीशी

उगाचंच सहजंच - कृष्ण आहे पाठीशी



प्रवास मग तो कसाही केलेला असो शेवटी अनुभव देणाराच असतो. अशाच अनुभवाला मी सामोरा गेलो आणि मथुरा या श्री कृष्ण जन्मभूमीला स्पर्शून आलो. फार काही न ठरवता आणि फार विचार न करता केलेला हा खटाटोप  नंतर मात्र आनंददायी झाला.
दिल्ली वरून जाताना 150 km सायकल आणि येताना उत्तर प्रदेश परिवहन मंडळाची बस असा दुहेरी अनुभव खरतर गमतीशीर आणि तितकाच साहसी होता. दिल्ली वरून निघाल्यावर अर्थात बऱ्याच ठिकाणी एकटा सायकल वरचा माणूस पाहून उत्सुकता होती अन काही ठिकाणी मात्र हरियाणा मध्ये bike, कार मधून काही लोकांनी पाठलाग केला किंवा एक दोघांनी अगदी खेटून कार चालवली , टक लावून बघितले पण अर्थात त्या सुनसान highway वर सायकल चालवत राहणे  या शिवाय पर्याय नव्हताच, तर काही ठिकाणी मीही गावात शिरून या लोकांचा पिच्छा सोडवला, सुर्दैवाने कोणी लुबाडले नाही.
अंधार पडायच्या आधी मथुरा गाठणे हे ध्येय असल्याने न थांबता जात राहिलो आणि 7 तासापेक्षा कमी वेळात मथुरा गाठली.
जन्मभूमी ला अर्थात सकाळी दर्शन घेण्याचं ठरवलं आणि सकाळी उठून मंदिर गाठले. अर्थात कुडकूडणाऱ्या थंडी मध्ये गर्दी नसली तरी बरेच लोक होते. मंदिराचा भव्य परिसर आणि कृष्ण राधे नामाचा गजर ते वातावरण अजून भारावून टाकणारा करत होता. काहीतरी अनामिक , अदृश्य पण तितकेच लोभस वाटावे असे अवती भवती असल्याचा भास होत होता अर्थात मंदिरातली मूर्ती सुद्धा तितकीच जिवंत आणि जन्मस्थान असलेली गुहा सुद्धा गंधित झालेली जाणवली.
दर्शन घेऊन मग परतीच्या प्रवासाला बस स्टँड गाठले आणि गजबजलेल्या स्टँडवर एक वयस्कर गृहस्थ मदतीला आले, दुसऱ्या बसचे कंडक्टर असूनही त्यांनी दिल्लीची बस शोधून दिली, मग दिल्ली च्या बस च्या कंडक्टरला गाठून सायकल विषयी चर्चा करून एका तिकिटाचे पैसे पडतील या बोलीवर सायकल टपावर चढवली , अर्थात मीच वर चढून बांधली आणि एकदाचा बस मध्ये बसलो. बस निघण्याची वेळ फिक्स नव्हती कारण सगळे सीट भरले की निघणार हे त्याने आधीच सगळ्यांना सांगितले होते. त्या मुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. बस अर्थात कशी बशी 4 चाकावर उभी राहिली होती आणि ही "चालू" पण होईल यावर ती "होई" पर्यंत माझा विश्वास नव्हता.
बस थांबलेली असल्या मूळे मग कचोरी, समोसा, औषधी तेल, पाचक चूर्ण ,असे फेरीवाले सतत आत बाहेर करत होते. धूर येणाऱ्या तेलाचा डेमो सुद्धा एक सेल्समन ने दाखवला, या सगळ्यात माझे मनोरंजन होत होते. हळूहळू बस भरली. खिडकीच्या सीट वरून भांडणे पण झाली, एक बाई तर "उलटी आली तरच खिडकी देणार का?" असे त्या गृहस्थाला विचारत होती, ते ऐकून मला मात्र हसू आवरले नाही. दुसरी कडे कंडक्टर तिकिटे काढत होता. शेवटी बस सुरू झाली आणि माझा जीव भांड्यात पडला. पण साधारण 20 मिनिटे झाली असावीत आणि बस पुन्हा थांबली कारण तिकिट चेकर बस मध्ये आला , त्याने बस मधली लोकं मोजली आणि एक तिकीट कमी सापडले, बिचाऱ्या कंडक्टर ने एका लहान मुलीचे तिकीट तिच्या वडिलांकडून घेतले नव्हते ती  6 वर्षाची होती. तिकीट चेकर ने मग कंडक्टर ला फैलावर  घेतले, टपावर ठेवलेल्या सायकल वर पण काही चर्चा झाली पण मला बोलावले नाही आणि बस पुढे निघाली.
सगळीकडून करकचून आवाज करणाऱ्या बस ने दिल्ली च्या दिशेनी कूच केले.
साडेपाच च्या सुमारास दिल्लीला पोहोचलो आणि पुन्हा टपावर चढून सायकल खाली उतरवली.
हा प्रवास अचानक, न ठरवता आणि उस्फुर्तपणे घडून आलेला होता अर्थात ढीगभर अनुभव आणि अंतर्मुख करणारे काही क्षण हाती देऊन संपला होता.
दिल्लीसारख्या शहरापासून केवळ 60 km असणाऱ्या पलवल सारख्या गावात अजूनही चांगले रस्ते, पाणी या सारख्या सोयी उपलब्ध नाहीत हा विरोधाभास उठून दिसतो. प्रगतीचा वेग इथे का मंदावतो या प्रश्नांची उत्तरे सापडणं मुश्किल.
सर्वसामान्य माणसांना बस चा प्रवास किती जिकरीचा आहे याचं चित्र दुर्दैवाने प्रत्येक राज्यात सारखंच आहे. मग ती महाराष्ट्रातली ST असो की यूपी मधली बस. चिखलाने भरलेल्या बसस्टँडवर पेसेंजर भरण्यासाठी धडपड करणाऱ्या कंडक्टर ची घालमेल हेलावून टाकणारी होती. विकसनशील असं बिरुद मिरवणाऱ्या आपल्या देशाला विकसित होण्यासाठी केवळ शहराचं उदात्तीकरण करून चालणार नाही हे मात्र खरं.
दिल्ली ला पोहोचलो आणि पुन्हा उंच supertech , supernova सारख्या tower ने आपले मोठे मनोरे समोर उभे केले, उंचीवरून वाहतूक करणाऱ्या flyovers ने खुणावून आपली उंची दाखवली आणि तितक्याच महागड्या गाड्या वेगाची चढाओढ करताना दिसल्या पण मी मात्र रस्त्यावर उभा राहून मागे वळून मला सोडलेल्या बस मधून उतरणाऱ्या सर्व सामान्य लोकांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो, तिकीटशिवाय प्रवास करणाऱ्या छोट्या मुलीच्या चेहऱ्यावरच्या निरागस भावना टिपत राहिलो, एकाच आशेवर की जेव्हा ती मोठी होईल तेव्हा माझा भारत बदललेला असेल...!
ज्या कृष्णाने वाटेत आलेल्या सगळ्या संकटांना दूर ठेवले त्याला पुन्हा स्मरले आणि मग अचानक जाणवले ते अनेक कृष्ण जे कित्येक वाटसरूंना साथ देत असतात कधी दृश्य तर कधी अदृश्य रूपाने. सायंकाळच्या आसमंतातल्या त्या अगणित रंगांना एक वेगळी झळाळी आली होती दिवस मावळला होता पण त्याच रंगांच्या साथीने पुन्हा उगवण्यासाठी.
चेहऱ्यावर हसू उमटले , वाटलं "सदा सर्वांच्या पाठीशी कृष्ण हवा हेच खरे " आणि एक आशा जी आयुष्यात खरोखर "जिवंत" ठेवेल..!

आनंद
21 जानेवारी 2020

Sunday, June 17, 2018

ऋतू पावसाळी



धुंद पावसाळी हवा
रंग सृष्टीचा हा नवा..
नवा साज तो लेवूनि
येई वेडी सर ही माहेरा....

चिंब ओली होते माती
नवे कोंब ते रुजती...
सावळ्या ढगांच्या साथीने
मन हिरव्या रंगात भिजती...

आळसावुनिया सृष्टी,
कूस ही बदले...
पुन्हा नांदायला येति ,
वर्षा ऋतूंची पाखरे...

निळा लुप्त झाला तरी,
सावळ्याची लागे ओढ..
पहिल्या प्रेमाची अशी ही,
भेट अधुरी क्षणभर..

इंद्रधनू कधी सोबती,
कधी गडद अंधार..
आठवांच्या या मौसमी,
कुणी छेडे तो गांधार..

आनंद
17 जून 2018

Wednesday, March 7, 2018

उगाचंच सहजंचं :- प्राजक्त





कधी प्राजक्ताचं फुल व्हावं, गळून पडावं अलगद जमिनीवर , कुणालाच कळू नये आपलं ते तरंगत जन्म घेणं,   कुणी पहाटे फुलं वेचून जावं पण आपण मात्र दडून बसावं कुणालाच न दिसता.  जवळच्या समुद्राच्या लाटांचा आवाज यावा आणि येत राहावा. काही काळ अनुभवावी ती निश्चल आणि चिरकाल वाटावी अशी शांतता. डोळे भरून बघावं निळं आकाश आणि त्याला खुणावावं उगाचंच.
 मग अचानक वाऱ्याने उठवावं त्या स्वप्नातून आणि जाणीव करून द्यावी तोकड्या आयुष्याची. उचलून फेकावं त्याने पायवाटेवर. मनात उगाच दाटावी भीती कुणाच्या पावला खाली चिरडले जाण्याची , मग अखंड काळ तोच विचार करत असताना एक नाजूक चिमुरडी ओंजळ यावी आणि आपल्याला अलगद उचलून घ्यावं.
माडाच्या वनातून सफर घडावी त्याच ओंजळीतून, समुद्र दिसावा आणि तिथेच सूर्यास्त ही. अश्रूंची दोन टिपं अलगद पडावी पाकळ्यांवर. अश्रू कुठले कसले काहीच न कळावं पण उगाच भरून यावं आपलंही मन,
परतावं पुन्हा अंधारलेल्या वाटेवरून त्याच ओंजळीतून, आता मात्र पुन्हा कधीच न परतण्यासाठी.
आपलीही वेळ संपत आलेली , एक दिवसाचं आयुष्य आता समारोपाला आलेलं. अश्रू आपले की त्या ओंजळीचे हे समजेनासं झालेलं. ओंजळीने सोडून द्यावा आपल्याला तुळशी वृंदावनावर ,तिथेच तेवणाऱ्या दिव्याने दिलासा मिळावा आणि
तेवढ्यात दिसावं चांदण्यांनी भरलेलं आकाश आणि ओढ लागावी पुन्हा जन्म घायची तेवढ्याच आशेने आणि सहजतेने.....!


आनंद
8  मार्च 2018

Thursday, February 15, 2018

आसमान




आसमान कभी अकेला नही होता,
पर फिर भी बहुत बैचैन रहता है आजकल..!


कभी जब धरती उसके नजरो के सामने से छुप जाती है,
 तो पानी की बुंदे हवाओ के साथ मिलकर आ जाती है उसका साथ देने, 
 कुछ चंद घडी गुजारती है..!


कभी जब धरती बहुत पास आ जाती है ,
तो पहाडो पे उतरके आसमान गुफ्तगु कर लेता है...!


कभी अंधेरी रात मैं चांद उजाला हो जाता है,
 तो आसमान पढ लेता है वो नज्म जो कभी लिखी थी..!


कभी पंछी उड़ते हुये मुस्कुराते है,
और सिखा जाते है नया तराना जो फिर बन जाता है साथी...!


कभी शाम को सूरज पुकारता है,
 और फिर समुन्दर की लहरों मैं उतर जाता है आसमान बेफ़िक्र होके....!


इतना सब इल्म जो मिलता रहता है ,आसमान को तो,
 फिर कौन कहेगा कि बेचारा अकेला है..!
फिर भी परछाई ढूंढता रहता है अक्सर ,
 शायद उसको अपने होने का यकीन अब तक नही है .....!


                                                                                                                15 फेब्रुवारी 2018

Sunday, December 17, 2017

जगणे म्हणजे



जगणे म्हणजे,
शिंपल्यातले मोती शोधत वाहणे,
कधी हर्ष तर कधी निराशा, हाती झेलत जाणे..!


जगणे म्हणजे,
शंखातुनी जन्म घेऊनि मुक्त आकाश पहावे,
तिमिर दूर कराया अपुलाच प्रकाश व्हावे..!


जगणे म्हणजे,
रेती वरती पाऊल रेखत जाणे,
पुसले जरी जुने ठसे तरी, लाटेला खुणवत हसणे...!


जगणे म्हणजे,
नव्या दिशेला प्रकाश शोधत जाणे,
कड्याकपारी ओलांडुनी पल्याड पाहत जावे...!


                                                                                आनंद
                                                                                          17 dec 2017

Monday, November 20, 2017

नशा




कुणी लुटावे शब्द बापुडे
कुणी उधळावे सूर,
कुणी विकावी रितीच ओंजळ
अन लागावी हुरहुर....


कुणी लुटावी निसर्गमाया
कुणी टिपावे शुभ्र चांदणे,
कुणी शोधाव्या अंधारछाया
व्हावे तेथेच नांदणे....


कुणी पळावे सुसाट आणि
कुणी अलगद तरंगावे,
कुणी डोकवे अंतरात
अन जगणे व्हावे गाणे....


कुणी जमवती सखे सोबती
कुणी खुशाल चेंडू,
कुणा खुणावते दिशा एकटी
चला तीच धुंडाळू....


कुणकुणाची कथा इथे अन
कुणकुणाची व्यथा
जगणे म्हणजे हेच असावे
तृप्तीची ही नशा...!




                                                                        आनंद
                                                                               Nov 2017

Monday, October 23, 2017

उगाचंच सहजंच - जुनं नवं



जुन्या नव्याचं नातं खरंच गमतीशीर, एकमेकांना न सोडता दूर जाणं आणि कधी कधी सोडूनही जवळ असणं.
कदाचित आपलाच अट्टाहास असतो सुखाची भोळी स्वप्न रंगावायचा , स्वप्नातले रंग भावले कि वर्तमानातली काळी पांढरी सोबत दिसेनाशी होते ती याच मुळे.


जे हातात आहे तेवढं सांभाळता यायला हवं बाकी सगळं खूप साधं सरळ होतं मग.
इतरांना समजेल किंवा उमजेल हा नंतर चा भाग झाला, पण अर्ध आयुष्य आपले विचार इतरांना पटवण्यात घालवण्यापेक्षा निश्चल पाण्याच्या डोहासारखं राहणं जास्त अर्थपूर्ण आणि तितकाच अवघड असतं. तरंग खुशाल उठू द्यावे पण नंतर पुन्हा शांत होता यायला पाहिजे.


गळून पडलेल्या पानाला जर हिरवळ भावली आणि त्याने तिथेच राहायचा अट्टाहास धरला तर ऋतूचक्र चालेल कसं, तिथे पानाने समर्पण करून मातीत मिळून जाणं जास्त महत्वाचं आहे म्हणजे झाडाला नवा हुरूप येईल आणि हिरवळीला पुढच्या पानगळीची ओढ लागेल .....!


आनंद
26 Oct 2017

Thursday, September 14, 2017

उगाचंच सहजंच - रंग




क्षितिजावर हलके हलके तरंगणारे रंग आणि त्यांच्या कडे बघून झुलणारं निळंशार पाणी जसा वेळ जाईल तसं ते नकळत त्याच्या रंगात मिसळून गेलं. जसा अंधार दाटू लागला तसा रेतीवर उमटलेल्या पावलांनी निरोप घेतला. फुटपाथ वरचे दिवे लागले आणि वाटा उजळून निघाल्या. आणि त्या पिवळ्या लालसर रंगात मागे असलेल्या हिरव्या झाडाची वाळलेली पाने दिसली. 

आयुष्याच्या संध्याकाळी विसावलेली जगाला फारसा उपयोग नसलेली त्यांचा फोटो काढतानाच एका वयस्कर आज्जीने आपुलकीने चौकशी केली आणि ते फोटोतले रंग बघून आश्चर्य व्यक्त केलं.
तिच्या आयुष्यातले रंगही असेच सुंदर असावेत असं उगाच वाटून गेलं....!
अंधारात नाहीशा होणाऱ्या वाटेवर ती निघूनही गेली...! 






Saturday, August 12, 2017

हसरते




हसरते आज कल खफा खफा सी रहती है
केहती है कि मै उनका खयाल नही रखता,
मैं सोचता हूं, अगर ऐसा होता तो फिर,
वो कौन है जिनसे मैं अक्सर गुफ़्तगू करता हू..!

फिर जब मैं उनसे ये पूछता हूं ,
तो केहती है ,कि वो सिने मैं बंदी पडी है कबसे,
उनको खुले आसमान कि आस है,
अब उनको ये कैसे समझावू के इसी हसरत से उन हसरतो को जिंदा रखा है......


आनंद
12 ऑगस्ट 2017

Monday, June 19, 2017

ठहराव



















चलो कुछ दो चार पल रुक जाते है इस भीड मैं, इसी जगह,
देखते है कि कोई रुक के पूछता है ,
या फिर चलती गाडी की खिडकी से सिर्फ झाकता है,
दौडके के कोई हात पकडता है ,
या फिर छोड देता है हमे उसी राह पर,


इस भाग दौड मैं शायद बिछड गया था जो मकाम,
क्या फिर वो पुकरता है उसी चाहत से,
या फिर सिर्फ एक सिसकी सी भर देता है
हमारे वापस न आनेसे ,


रिश्ते जो बंद दरवाजो कि तरह चूप है,
क्या वो जग जायेंगे मेरे थमने से,
या फिर बिना कुछ कहे सुने निकल जायेंगे 
पीछे के दरवाजे से,


सबका आसमान वही तो था,
फिर बारिश कि बुंदे अलग कैसे हो गई,
ये काम आती थी जब लब्ज सुखेे पड जातें थे,
और रिश्तो को गिला करना होता था.


शुक्र इस बात का है कि फूल अभी तक
किराया नाही मांगते खुशबू का
वरना जो फुल कभी अपने थे 
वो पास से गुजरने पर थमा देते कागज कि पर्ची .....


जाने अंजाने इतने पेड खडे है राह मैं
उनकी अनगिनत टेहनिया झुलती है हवा मैं,
उसमे से एक टेहनी को तो याद होगी ,मेरी हथेली से पि हुई दो बुंदे....


अब ना गिला है ठहरने का और ना अफसोस है गुजरे लम्हो का,
सिर्फ ये चाहत है कि कोई यादों मैं बसे हुये घर से निकल के जालों को हटाये,
और खिडकी कि एक टुटी कांच से सुबह कि एक किरण अंदर झाक कर देखे,
मन हि मन मुस्काये और फिर लौट जाये अपने घर सुरज के साथ फिर लोटने के लिये.....!


                                                                                                   आनंद
                                                                                                  19 जून 2017


Monday, May 29, 2017

उगाचंच सहजच 4 : धुकं

आयुष्यातले कुठल्या क्षणांसाठी माणसाने स्वतः ला विसरून जावं ? आणि मुळात हि सुखाची हि धडपड कशासाठी ? असे प्रश्न खरतर खूप साधे आणि अनेकांना पडणारे.
अशा वेळी मला आठवतं ते धुकं.

समोरचं किंवा आजूबाजूचं दिसत नसूनही मनाला त्या अनिश्चिततेमध्ये आनंद वाटत असतो. पायाखालची वाट सोडून आजूबाजूला काहीही दिसलं नाही तरी सगळ्या गोष्टी आहेत तिथेच असतात. फक्त आपल्याला त्या दिसेनाशा होतात.

कुणाच्या इच्छेने धुकं कधी दाटत नाही. अनुरूप परिस्थिती निर्माण झाली कि ते आपसूक येतं.
आयुष्यातल्या अशा धुक्याना सुद्धा सामोरं जाता येणं म्हणजे खरतर मजा आहे. त्याच्याशी दोन हात केले आणि आपल्यातला प्रकाशाची जाणीव समोरच्याला झाली कि ते आपोआप विरळ होतं आणि अचानक गायब सुद्धा होतं.

आपल्या आतला प्रकाशाची ज्योत महत्वाची, ती जपत रहायचं मग अंधार असो  वा धुके असो वाट नेहमी उजळत राहते.
आणि याच उजळलेल्या वाटांवर आपल्याला स्वतः ला विसरायला लावणारे क्षण  आणि त्या सोबत येणारं सुख दोन्हीही गवासतात.
                                                                                                                          आनंद
                                                                                                                          29 मे 2017

Wednesday, April 5, 2017

वास्तव आणि स्वप्न

वास्तव आणि स्वप्न यात खरंतर कितीसा फरक असतो ? एका क्षणात गोष्टी घडूही शकतात आणि विसरू हि शकतात. गरज असते ती आहे त्या गोष्टीला सामोरं जाण्याची.

माणसाची किंमत आणि हिम्मत ठरते ती त्यावरूनच कारण पठारावरून वरून दिसणारं वास्तव कितीही हवाहवासा असलं तरीही शिखराचं स्वप्न असेल तर जग ठेंगणंच वाटतं.
म्हणूनच गरज असते ती समतोल साधण्याची वास्तवाला सामोरं जाताना स्वप्न विरून जाऊ नये म्हणून डोंगर पार करत राहायचं मग भलेही एखाद्या दरीत उतरून पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली तरीही शिखर मात्र स्वप्नात जपायचं.....
                                                                                                                                5 एप्रिल 2017

Wednesday, March 22, 2017

उगाचंच सहजंच 3 : उनाड


उगाचंच कधीतरी उनाड व्हावं, घराबाहेर बाहेर पडावं , पहावं मोकळं क्षिजित ,द्यावी एक साद त्या भटक्या आभाळाला.
त्यानेही वळून पहावं आणि हसावं गालातल्या गालात ,
हिणवावं खवळलेल्या समुद्राला , किनारा गाठू न शकणाऱ्या त्याच्या लाटेला राग यावा, वाऱ्याने पहावी तिची तगमग आणि लाटेला साथ देऊन आणून सोडावं किनाऱ्यावर, वाळूनं तृप्त व्हावं त्या चिंब स्पर्शानं आणि तोच क्षणात दूर व्हावी लाट, पुन्हा जन्म घ्यावा त्याच जुन्या जाणिवेनं.

दूर कड्यावरच्या एखाद्या वाळक्या झाडाने लक्ष वेधून घ्यावं, निष्पर्ण पण तरीही रेखीव, आकाशात ढगांची नांदी व्हावी आणि तोच एका चिंब सरीने मातीला गंध देऊन जावा, तृप्त होऊन त्या वाळक्या झाडाच्या शेवटच्या पानाने फांदीला निरोप द्यावा. पुन्हा उमटावी तीच जुनी निष्पर्णतेची जाणीव.

आपण हे सर्व पाहावं दुरून डोळ्यादेखत पण तरीही अंतर ठेवून अलिप्तपणे.
हीच अलिप्तता जपता यायला हवी , त्यातून कधी त्रयस्थपणे काही गोष्टी शिकता येतात पाहता येतात, एखाद्या प्रसंगात, अनुभवात स्वतः न गुंतता त्यातल्या बारकाव्याशी जोडून अर्थ लावता यायला हवा.

                                                                                                                                      आनंद

Tuesday, February 28, 2017

Wanderlust Diaries : Girnar Hiking


"Somewhere between the bottom of the climb and the summit is the answer to the mystery why we climb.”

Our journey of Hiking the Girnar hill  35000 footsteps which includes more than 20000 rock steps (ascend + Descend) and elevation of 3666 ft height was an breathtaking experience and great endurance test as well.  It took 5.5 hours to climb and 4.5 hours to descend.

It was combination of steep climbs, forest ,cold breeze , star gazing in dark night,  mesmerising sunrise from Lord Dattatreya temple, splendid views of valley's from top and strong sunlight while descending.

In the end it has become lifetime memory which is all about will power, faith and belief that made this possible.

                                                                                   Anand
                                                                                   26 feb 2017

Monday, January 9, 2017

वेल


सहज सुंदर नाती कुठेही जुळतात, त्याला वेळेचं काळाचं बंधन नसतं.
झाड वाढतं तसं खरंतर ते एकटं होऊ लागतं फांद्या वर जातात जमीन दूर होऊ लागते.
फांद्यांना आकाश हवं असतं अन खोडाला जमीन. 
अशा वेळी एखादी वेल कुठूनशी येते आणि दोघांची गाठ बांधून ठेवते.

सगळ्याच झाडांना अशा वेली मिळत नाहीत. त्याला नशीब लागतं. 
जग मात्र त्या वेलीला परावलंबी म्हणून हिणवत राहतं. 
ज्याला जे हवं ते मिळवून देऊन वेल मात्र झुरत राहते. धागा जोडणाऱ्या या वेली मला जास्त भावतात ते त्याच मुळे. 
माणसांना जोडायला अशाच वेलींची गरज असते अवती भवतीच्याच जगात त्या असतातही फक्त त्या साठी झाडाच्या फांदी सारखं थोडं झुकावं लागतं 
आणि खोडा सारखं आधारवड व्हावं लागतं वेल आपोआप तुम्हाला बिलगते.



आनंद

Saturday, December 31, 2016

शब्द



शब्द नेहमी “गर्भार” असतात असं कुठेशी ऐकलेलं वाक्य .अचानक एकदम पुन्हा आठवलं आणि समोर आले ते तेच नेहमीचे ओळखीचे आणि तितकेच नवे शब्द ...! खरंच आहे पण शब्द इतक्या भावनांना जन्म देतात कधी व्यक्त तर कधी अव्यक्त..! जन्म दिलेल्या प्रत्येक वाक्याला अर्थ मिळतो आणि तिथे सुरु होतो चांगलं वाईट या रस्त्यावरचा प्रवास...!

काय गंमत असते नाही या शब्दांची , कधी एकांतात कुठेशी नजर लावून दूर पाहावं तर अचानक मनात दाटून येऊन गर्दी करतात. झरझर वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहा सारखे समोरून वाहतात. आठवणींशी असलेल्या घट्ट नात्याला निभावत कधी डोळ्याच्या कडा पाणावून टाकतात हे समजत सुद्धा नाही. एकांतातल्या अशा शब्दांना ओढ असते हातून सुटलेल्या क्षणांची .

कधी मात्र हेच शब्द खरोखर खळाळत्या पाण्यासारखे होतात. समोरचं माणूस कोण आहे कसं आहे याची फिकीर न बाळगता वाऱ्या सोबत मैत्री करून बेफाम होतात . त्यांच्या त्या कचाट्यात भलेभले अडकतात. असे हे शब्द जन्म देतात अनेक जिवंत क्षणांना आणि त्यात कधी रुजतात नवी नाती..!

कधी हेच शब्द जणू रुसल्या सारखे वागतात , मनात गर्दी करतात पण ओठातून जन्म घेत नाहीत , कधी वाट पाहत बसतात तर कधी कुणावर चिडून मुके होतात. समंजस नाती अशा न बोललेल्या शब्दांनी सुद्धा टिकून राहतात, नकळत केलेल्या मुक्या संवादाने जोडून राहतात. आपण उगाच अमुक अमुक माणसाला मनातल कळत असं म्हणत राहतो खरंतर शब्द तिथेही असतात फक्त त्यांचं अदृश्य रूप कुणालाच दिसत नाही. 

कधी शब्द बोचरे होतात , परिस्थितीला जुगारून वेगळे होतात , कधी समोरच्यावर तुटून पडतात तर कधी तीक्ष्ण बाणासारखे खुपतात. या शब्दांनी खोलवर झालेल्या जखमेला भरून यायला कधी आयुष्य पुरत नाही. नाती दुरावणारे हेच शब्द स्वतः किती एकटे असतील याची  मात्र कुणाला काळजी नसते.

रक्ताची नाती , मैत्रीची नाती , मानलेली नाती, जुळलेली नाती, बोजड नाती, हवीहवीशी नाती, ताणलेली नाती या सगळ्यात एक धागा समान असतो तो म्हणजे गर्भार शब्दांचा... कधी काय जन्मेल याचा काहीच पत्ता नसलेले सगळे जीव मात्र या शब्दांशी झुरत राहतात.  दूरचे कधी जवळ येतात तर कधी साद वेळेत न पोहोचल्याने कायमचा दुरावा निर्माण होतो.

आज वर्ष संपतंय , आणि अशाच सरत्या वर्षाचा मागोवा घेताना जाणवले ते फक्त असेच  गर्भार शब्दच ... त्यांचीच सोबत खूप महत्वाची ठरली आणि किनारा लवकर सापडला. पुढेही त्यांची सोबत अशीच राहणार असली तरी गेलेल्या शब्दांशी पुन्हा भेट नाहीच हे दुखः ही आहेच.  
आठवड्यापूर्वी पेरलेल्या बी मधून फुटलेला पहिला कोंब हा सुद्धा संवाद साधत असतोच, कोवळं असणं म्हणजे काय याची पुर्णतः प्रचिती देणारा आणि स्वतंत्रपणे मोकळ्या आकाशाकडे पाहणारा. निसर्ग आणि त्याचं हे मूक संवादाचं रुपडं म्हणजे शाश्वत गोष्टीं मधला अजून एक अनुभव...! 
शब्दवीण संवादु असं म्हटलं तरीही आत खोलवर काहूर असतच . नव्याने येणाऱ्या वळणाना आणि काही कोवळ्या लहानग्या शब्दांना पुन्हा घडवायला तयार होऊया कारण खरंतर “शब्द” फक्त संवाद साधतात आणि तेवढंच त्यांचं आयुष्य असतं..!


आनंद
३१ डिसेंबर २०१६   

Wednesday, October 12, 2016

उगाचंच सहजच 2 : हट्ट


कधीतरी उगाच हिरमुसून बसावं , रुसावं या आयुष्यावर , हट्ट करावा उगाच 
आणि दूर कुठे क्षितिजावर बुडून गेलेल्या सूर्याला म्हणावं नको येऊस पुन्हा, 
असं म्हणताच वाऱ्याने येऊन कानाशी कुजबूज करावी, 
त्या गार झुळुकेने छेडले जावे जुने ठेवणीतले सूर आणि 
अचानक डोळ्या समोर यावे धूसर पावसाळी दिवसाचे क्षण , 
त्यात दिसणाऱ्या समोर पडणाऱ्या थेंबानी हळूच कानोसा घेऊन 
आपल्या कडे बघावं आणि जमिनीत लुप्त होऊन जावं, 
मग दिसावी उबदार चूल आणि बाडगणाऱ्या ज्वाळा 
त्या मैफिलीत फडफडणाऱ्या पिवळ्या दिव्याने आपला जीव मुक्त करावा आणि
पसरावा काळामिट्ट अंधार आणि मग पुन्हां हिरमुसून बसावं,
हट्ट करावा ,रुसावं आणि कोसावं त्या दिव्याला परत उजळण्यासाठी, क्षणात डोळे उघडावे आणि 
बघावं समोर तांबड्या रंगाच्या क्षितिजावरून वर येणारं लाल सूर्य बिंब.....!


                                                             आनंद
                                                                                                                     
12 ऑक्टोबर 2016


Friday, September 30, 2016

जगण्यातला अर्थ





नको नभा तो तुझा पसारा
नको पर्वता तुझा नजारा
अफाट तुझिया दुनियेमध्ये,
एकही घरटे नसे पामरा....!

नको सागरा तुझा किनारा
नको दिशांचा तोच इशारा
धुंडाळूनी या जगास साऱ्या,
एकटाच तो फिरतो वारा....!

इथेच थांबून वळतो आता
इथेच थांबून जगतो आता
हरवून गेले तेच शोधतो
विसरून गेले ते आठवतो..!

हिशोब सारा इतका सोपा
अवघड उगाच करुनी बसलो,
उगा धावून काय मिळवले
चैन जीवाचा गमवुनी बसलो..!

सावलीत या सुखावतो अन,
ओंजळीत या घेतो माती...
विहीर अजून ती तशीच ओली,
कवेत घेतो काळे मोती...

कुठे झऱ्याची मंजुळ गाणी
कुठे वाहते नितळ  पाणी,
कुठे डोलते एकच पाते
जगास साऱ्या ते न्याहळते..!

प्रकाश खेळे लपंडाव अन
कधी सरी या डाव साधती,
ओथंबून हि पाने हिरवी
त्या तालावर स्वैर नाचती...

मुक्त पहाटे दिसे पाखरू,
बंधन त्याला नसे उडाया,
सांजवेळ हि येता दाटून,
घरट्यातच मग मिळते माया,

निसर्ग सांगे कसे वहावे
कसे लुटावे त्याचे देणे,
द्यावे घ्यावे आनंदाने,
अन नांदावे सोबतीने...!

साधे सोपे सरळ जगावे
नकोच खोटा तो देखावा,
श्वासाचे ते गणित नसावे,
जगण्याला या अर्थ द्यावा....!

                                                    आनंद
                                                                                                                         30 सप्टेंबर 2016